जळगांव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटने कडून “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंध आणि चिकित्सा” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला तज्ञ साधन व्यक्ती म्हणून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, येथील प्रा.डॉ.संतोष सुरडकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष तथा सिनेट सदस्य प्रा.डॉ.जयवंत मगर होते. या वेळी विचारमंचावर संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.बी.ए. संदानशिव, संघटनेचे केंद्रीय सचिव प्रा.डॉ.अनिल हिवाळे, प्रा.डॉ.योगेश महाले, प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.साहेब पडलवार आदी मान्यवर हजर होते.

या वेळी बोलताना डॉ.संतोष सुरडकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली. नवीन शैक्षणिक सरकारी शिक्षण व्यवस्था संपवणार यावर प्रकाशझोत टाकला. नवीन शैक्षणिक धोरणामुळे आगामी काळात लहान गावातील शाळा, महाविद्यालय बंद होण्याची आणि गरिबांची मुल शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट सुसंस्कृत समाज निर्माण करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा.डॉ. जयवंत मगर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे आगामी काळात निर्माण होणाऱ्या समस्यांची आणि त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गाची जाणीव सर्वांना करून दिली. सर्वांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करावी असे आवाहन केले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ राहुल निकम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.डॉ. योगेश महाले यांनी केले.
