सामाजिक कार्यकर्ते चिंधु वानखेडे यांना निवृत्त सेवा पुरस्कार जाहीर…

     अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते चिंधु वानखेडे यांना सन २०२४- २०२५ चा महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, पुणेचा निवृत्त सेवा पुरस्कार जाहीर.

    सविस्तर वृत्त की,महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, पुणे या संघटनेच्या माध्यमातून राज्य भर सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.संघटनेतील सभासद यांना प्रोत्साहन मिळावे व कार्य करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून दर वर्षी पुरस्कार प्रदान केले जाते.

       सन २०२४- २०२५ या वर्षाचा “निवृत्ती सेवा पुरस्कार” साठी अनेक अर्ज असोसिएशन कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. पुरस्कार निवड समितीने अर्जाची छाननी करून अमळनेर येथील रहिवासी व पेन्शर्स असोसिएशन चे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी केंद्रीय शिक्षक चिंधु वानखेडे यांना असोसिएशन चे अध्यक्ष मनोहर पोपलाईत यांनी संघटनेच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते जाहीर केले.महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले .

     पुरस्काराचे स्वरूप 

     महाराष्ट्र पेनशनर्स असोसिएशन, पुणेचे सन्मान चिन्ह, मानपत्र,शाल व रोख रूपये ५००/- देण्यात येणार आहे.

      पुरस्कार वितरण समारंभ हा श्रीक्षेत्र नर्सीनामदेव, ता. सेनगांव, जि. हिंगोली येथे मंगळवार, दिनांक ३/०२/२०२६ रोजी सकाळी १०.३० वा. ते दुपारी २.०० वाजे पर्यंत प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे हस्ते देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!