अमळनेर येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा दिव्य लोकतंत्र न्यूज चे संपादक समाधान मैराळे एमबीआर मानद डॉक्टरेट पुरस्कार ने सन्मानित.

सविस्तर वृत्त की,एमबीआर मानद डॉक्टरेट पुरस्कार” हा भारतातील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड द्वारे प्रदान केला जाणारा एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार समाजातील अपवादात्मक योगदानासाठी किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आजीवन कामगिरीसाठी दिला जातो. हा पुरस्कार ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत वर्ग-४१ मध्ये नोंदणीकृत आहे.
पुरस्कार्थीची पात्रता:-
समाजात किंवा त्यांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती पात्र आहेत.
पुरस्कार चा उद्देश :-
हा पुरस्कार व्यक्तींना त्यांच्या जीवनातील अनुभव आणि अपवादात्मक योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी दिला जातो.
या पूर्वी पुरस्कार मिळविणाऱ्या मान्यवरांची माहिती :-
1) इंदूर येथील संजय अयाचित यांना न्यूरोथेरपीमधील त्यांच्या कार्यासाठी “एमबीआर मानद डॉक्टरेट पुरस्कार – २०२३” मिळाला.
2) कला क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. सौम्यरंजन बाळ यांना २०२३ मध्ये हाच पुरस्कार मिळाला.
3) डॉ. पूर्णिमा अरविंद पाध्ये यांना मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे नाशिक विभागीय अध्यक्ष समाधान मैराळे यांनी आपल्या पत्रकारितेतून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून दिल्या व पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. या बाबीची दखल घेत संस्थेने दिल्ली येथे पार पडलेल्या सोहळ्यात मानद डॉक्टरेट पुरस्कार देऊन सन्मानित केले. याप्रसंगी देश विदेशातुन अनेक पुरस्कार्थी उपस्थित होते.
श्री समाधान मैराळे यांना मानद डॉक्टरेट पुरस्कार मिळाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे, जिल्हाध्यक्ष सुनिल भोळे,जिल्हा चिटणीस सुरेश कांबळे, उपाध्यक्ष यदुवीर पाटील,महिला पत्रकार संघच्या जिल्हध्यक्षा भाग्यश्री पाटील,अमळनेर पत्रकार संघांचे नूर खान, प्रवीण बैसाणे, आत्माराम अहिरे, हितेंद्र बडगुजर, सुरेंद्र जैन, राहुल भदाने, रिझवान शेख, योगेश पाने आदींनी त्यांचे अभिनंदनचा वर्षाव केला.
