टाकरखेडा येथील समाधान शिबिरात बालविवाह मुक्त भारत अभियान 

 

अमळनेर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अमळनेर टाकरखेडा येथे दिनांक 12 जून 2025 रोजी सर्व शासकीय योजना माहिती प्रदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 आधार संस्था,जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्पाचा प्रदर्शन स्टॉल द्वारे नागरिकांना बालविवाह मुक्त भारत अभियान विषयी माहिती देण्यात आली. नागरिकांना बालविवाह मुक्त भारत करण्याचे आवाहन केले .

प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषी विभाग अधिकारी, पंचायत समिती,आरोग्य विभाग,पोलिस , विधी सहाय्यक प्रशासन,महिला बचत गट , शासकीय कर्मचारी उपस्थित राहून योजने विषयी मार्गदर्शन करत आहेत.

आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर जिल्हा जळगाव ,जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन टीम मेंबर अध्यक्ष डॉ भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद , प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, समाधान अहिरे, भावेश मराठे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!