अमळनेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शहर चिटणीस पदी चिंधु वानखेडे यांची नियुक्ती…

 

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री चिंधु वानखेडे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमळनेर शहर चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आले.

अलीकडेच अमळनेर तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक निष्ठावन्त म्हणवून घेणाऱ्यांनी बंडाळी करत अजित पवार यांच्या सोबत जाण्यात धन्यता मानली. या प्रकारामुळे जनसामान्यानीं एकनिष्ठतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले तर शरद पवार गट या फुटीर वाद्यानां येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा दाखवणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सह अनेक दिग्गजानी पक्षांतर केले आहे. मात्र असे असले तरी अमळनेर मध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत आहे.

याचाच एक भाग म्हणून अमळनेर मधील अगदी प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिक्षक तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, नवी दिल्ली या संघटनेचे जिल्हा चिटणीस श्री चिंधु वानखेडे यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यानीं त्यांना अमळनेर शहर चिटणीस पदी नियुक्ती केली. सदर नियुक्ती पत्र राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ बि एस पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे उमेश पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

श्री चिंधु वानखेडे यांनी देशोन्नतीला सांगितले की, पक्षाने माझ्यावर विश्वास दाखलवला असल्याने विश्वासाला तडा पडू देणार नाही. तळा गाळातील सर्व सामान्य माणसाला पक्षात आणून एक वज्र मूठ बांधणार. संविधानाला अपेक्षित राजकारनातून जनतेची कामे करणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!