माजी आमदार शिरीष चौधरी २९ ला तर मंत्री अनिल पाटील २४ ला अर्ज भरणार…..

अमळनेर प्रतिनिधी येथील उपविभागीय कार्यालयात दिनांक २२ पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने युतीचे अनिल पाटील हे दिनांक २४ रोजी तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले माजी आमदार शिरीष चौधरी हे दिनांक २३ च्या शुभ मुहर्तावर अर्ज भरणार असून दिनांक २९ रोजी शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे कळत.मात्र आघाडीचा संभाव्य उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसल्या कारणाने कोण व कधी उमेदवारी अर्ज भरणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अमळनेर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी नामनिर्देशन सादर करण्यासाठी उमेदवार स्वतः व किमान एक प्रस्तावक हजर असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ असणार आहे. एक उमेदवार निव्वळ दोन विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरू शकतो. तर एका ठिकाणी उमेदवाराला फक्त चार अर्ज भरता येतील. पक्षाच्या उमेदवारासाठी एक प्रस्तावक आणि अपक्ष उमेदवारासाठी दहा प्रस्तावक आवश्यक असतील. प्रस्तावक हे मतदार संघातीलच मतदार असणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सादर करावे लागणार आहे. सर्वसाधारण उमेदवारासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. पक्षाचा एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. एबी फॉर्म मूळ शाईच्या स्वाक्षरीत असावा. उमेदवाराने अर्ज भरते वेळी फक्त चार लोकांनाच सोबत आणावे तसेच सोबत फक्त तीनच वाहने आणावीत, अश्या सूचना देण्यात आल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!