लढ़लो-लढणार, माया – बाप जनतेच्या सन्मानासाठी – मा आमदार शिरीष चौधरी 

अमळनेर प्रतिनिधी, येथील मुडी-मांडळ, कळमसरे-डांगरी, अमळगाव-पातोंडा, व जानवे- मंगरूळ येथे शिरीषदादा मित्र परिवार पदाधिकारी मेळावे उत्साहात संपन्न.

सदर मेळाव्य प्रंसगी श्री.रविन्द्र बापू चौधरी ( चेअरमन हिरा उद्योग समूह )यांनी मनोगतात सांगितले कि, अमळनेर विधानसभा मतदार संघाने आम्हाला एव्हढे प्रेम दिले कि ते मी शब्दात मांड्र शकत नाही. मी व माझा परिवार सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितो. आपण भविष्यात देखील असेच प्रेम व आशीर्वाद शिरीषदादांना द्याल हि अपेक्षा व्यक्त करतो.

सदर प्रसंगी श्री. गुलाब पाटील यांनी सांगितले कि मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे जोमाने स्वयंपूर्तीने कामाला लागले आहेत.कार्यकत्याच्या विश्वासावर दादा येणाऱ्या दिनांक २८ ऑक्टोंबर २०२४ वार सोमवार रोजी सकाळी १०:०० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असून आपण वाजत गाजत हजारोंच्या संख्येने यावे, असे आव्हान त्यांनी या वेळी केले.

माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी मेळ्याव्यात संबोधित करतांना सांगितले कि माझी उमेदवारी माय-बाप जनतेच्या सन्मानासाठी शेतकरी, कष्टकरींच्या न्याय हक्कासाठी,माता-भगिनींच्या संरक्षणासाठी, युवकांच्या हितासाठी माझी उमेदवारी अपक्ष दाखल करत आहे.आपल्याला सांगण्याची गरज नाही.आपण सर्वजण सुज्ञ आहोत.

या मेळाव्याला पंचक्रोषितील असंख्य ग्रामस्थ हजर होते.वृध्द महिलांनी तर शिरीष चौधरी यांचे गालाचे मुक्के घेऊन आशिर्वाद सुध्दा दिले.काहींनी त्यांचे औक्षण केले.तरुणांनी शिरीष चौधरी यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!