मुंबई प्रतिनिधी, अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतील सूचनांनुसार शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची तयारी, प्रक्रिया, शिजवणे वेगळी असावी. शाकाहारी अन्नपदार्थाची मांसाहारी अन्नपदार्थापासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द , दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.जे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.

अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हज़ार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षे बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर या वर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोज़न करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीरबाब नसून ग्राहकांच्याआरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे.नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापनांना त्वरित नोटीस.कारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे.
