नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी ” जिल्हा परिषद आपल्या दारी ” उपक्रमाचे आज होणार उदघाटन….

 

जळगाव जि.प.च्या कर्तव्यदक्ष सीईओ मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त की, अनेक वर्षापासुन नागरिकांच्या तक्रारी पडून असल्याने त्या निवारणासाठी नागरिकाना जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सतत कराव्या लागणाया फेऱ्या आणि त्यामुळे लागणारा वेळ आणि होणाऱ्या पैशांचाअपव्यय या सर्व गोष्टीचा विचार करून हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचे जि.प.च्या कर्तव्यदक्ष सीईओ मीनल करनवाल यांनी सांगितले.

या उपक्रमाचे उद्घाटन आज दि २१ रोजी सकाळी १০ वाजता धरणगाव पंचायत समिती येथे होणार आहे. या वेळी तक्रारदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.

या उपक़मांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती स्तरावर दर महिन्याला किमान दोन वेळा तक्रार निवारण दिन आयोजित केला जाणार आहे. या दिवशी

जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख प्रत्यक्ष उपस्थीत राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतील व त्यांचे तत्काळ निराकरण करण्यात येईल.

 

उपक्रमाचे मुख्य उद्दिष्टे :-

1) नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी सोड़वणे, 

2) प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद बळकट करणे.

3) वेळेत व पारदर्शक पद्धतीने सेवा देणे. 

4) तक्रारींचे तातडीने निराकरण करून विश्वास निर्माण करणे.

हा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून’ सशत्त लोकशाहीसाठी सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था या दिशेने एक प्रभावी टप्पा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!