अमळनेर,शासकिय बांधकाम ठेकेदार श्री लोकेश पवार यांना महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजने अंतगत मौजे तामसवाडी ग्रामपंचायतीच्या रस्ता कॉक्रिटीकरणाचे पाच लक्ष किमतीचे काम पुर्ण झालेल्या कामाचा धनादेश ग्रामपंचायत अधिकारी दिनेश साळुंखे यांनी अदा करून एकूण रक्कमेच्या दहा टक्के रक्कम चाळीस हजार दिल्या शिवाय मी तुझ्या पुढच्या कामाचे बिल काढणार नाही” असे सांगितल्याने दिनेश साळुंखे यांनी श्री लोकेश पवार यांच्या कडे लाचेची मागणी केल्याची तक्रार दि. 19/05/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी यांच्याकडे पारोळा येथे तक्रार दिली होती.
दिलेल्या तक्रारीची पडताळणी करण्याकरीता दि.19/05/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली खांडवी यांनी श्री लोकेश पवार यांचा कडे व्हाईस रेकॉर्डर चालु करून देवुन पारोळा येथील अंबिका डेअरी जवळील रसवंती येथे मला ग्रामपंचायत अधिकारी दिनेश साळुंखे यांची भेट घेण्यासाठी पंच कल्पेश खैरनार यांचे सह दुचाकीने रवाना केले.मात्र साळुंखे याने अमळनेर येथे पैसे घेऊन बोलावले असता पंच सह पथक अमळनेर येथे रवाना झाले. अमळनेर शहरातील सुभाष चौकात आरोपी यांनी श्री लोकेश पवार यांना बोलावून घेतले व त्याच्या दुचाकीवरून दगडी दरवाजा समोरील राजे संभाजी चौकात थांबवून दुचाकीच्या पायदानांवर लाचेची रक्कम ठेवण्यास सांगितले.नंतर साळूंखे याने लगेचच सदर लाचेची रक्कम उचलून पॅन्ट च्या चोर खिशात ठेवली व धुळे रस्त्या कडे जलद गतीने निघून गेले. मात्र मागोवा घेणाऱ्या सापळा पथकाने पाठलाग करीत हॉटेल वंश च्या समोर दिनेश साळूंखे यांना त्यांच्या कडून पकडून सापळा पथकाने पावडर लावलेली लाचेची स्वीकारलेली रक्कम हस्तगत करून पुढील कारवाई करिता अमळनेर पोलीस ठाण्यात दिनेश साळूंखे च्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
