जळगाव, केद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार (हरभरा- हमीभाव- ५६७०) नाफेड अंतर्गत रब्बी हंगाम २०२४- २५ हरभरा खरेदी करीता जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर,पारोळा,चोपड़ा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव भुसावळ,यावल, रावेर, मुतक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळिसगाव या तालुक्यांमध्ये एकूण ৭६ हरभरा खरेदी केद्रे सुरू करण्यात आली आहेत.

शेतकरी नोंदणीसाठी 3० मे पर्यत मुदतवाढ़ देण्यात आली आहे. तर खरेदी कालावथी-१ एप्रिल ते २९ जून असा राहील.तरी शेतकऱ्यानी हरभरा नोंदणी आणि खरेदीचा लाभ घ्यावा व ऑनलाइन नोंदणीसाठी आधारकार्ड,बैंक पासबुक आणि ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केद्रावर ज्ञाऊन नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, तसेच विभागीय संचालक मंत्री संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम,सचालक संजय पवार तसेच जिलहा पणन अधिकारी एस.एस. मेणे यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
