अमळनेर : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला असून, यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

