अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस हंगाम २०२४ -२५ मध्ये किमान हमी दराने कापूस विक्रीसाठी मुदत वाढ देण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

बशासनाने दिलेल्या निर्देशानुसार भारतीय कपास निगम (CCI) चालू हंगाम (ऑक्टोबर २०२४-सप्टेंबर २०२५ )मधील MSP अंतर्गत कापसासाठी आगाऊ किंवा जागेवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्या कडून कापूस खरेदी करत आहे. तथापि दि. ३०-०९-२०२५ रोजी संपणाऱ्यां चालू कापूस हंगामात कापूस विकन्यास पात्र ठरून MSP योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरयांनी दि १५-०३-२०२५ रोजी किवा त्यापुर्वी स्वत त्याची नोंद करणे आवश्यक आहे. असे आता सीसीआयने कळविले आहे. त्यामुळे दि. १५-०३-२०२५ किवा त्यापुर्वी सीसीआयकडे शेतकरयांनी नोद न केल्यास हंगाम २०२४-२५ मध्ये हमी दराने सीसीआयला कापूस विक्रिसाठी पात्र नसेल, असे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कळविले आहे.
