प्रतापच्या ज्योत्स्ना पाटील व देवयानी कोळी या दोघांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेस निवड..

अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त),अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू ज्योत्स्ना जितेंद्र पाटील(अकरावी विज्ञान),रा.खेडी व्यवहारधडे,देवयानी भागवत कोळी(अकरावी विज्ञान),रा.तामसवाडी या दोघांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठो निवड झाली आहे,ही स्पर्धा 5 व 6 एप्रिल 2025 रोजी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. या पूर्वी त्यांची जालना,महाराष्ट्र या ठिकाणी 14,15 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली होती, त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे त्यांची राष्ट्रीय खेळासाठी निवड झाली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी , प्राचार्य डॉ.ए. बी.जैन सह सर्व प्राध्यापक वृंद आदींनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!