पणन विभागचे उपसचिवांवर गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्या..गावरान जागल्या सेनेचे मुख्यमंत्रीना विंनती पत्र

अमळनेर येथील गावरान जागल्या सेनेच्या माध्यमातून विनंती पत्र व स्मरणपत्र देऊन त्या कामी नियमित पाठपुरावा करूनही संबंधित उपसचिव ( पणन) स. ,पणन विभाग, मुंबई यांनी सदर कामी कोणतीही न्याथोचीत अशी उपाययोजना व तजबीज केलेली नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याकामी परवानगी मिळावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली मागणी.

सविस्तर वृत्त असे की,मा. उपसचिव (पणन) , पणन विभाग, मंत्रालय , मुंबई या जबाबदार पदावरील जबाबदार निर्णयाक्षम पदाधिकारी या नात्याने तात्काळ / प्रथम प्राधान्याने विचारात घेऊन तात्काळ उपाययोजना केली असती तर आज शेतकऱ्यांची अधोगती व आत्महत्या थांबल्या असत्या व पर्यायी शेतकरयांना काहीतरी न्याय मिळाला असता. मात्र मा. उपसचिव ( पणन) पणन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी सदर बाब गांभी्याने विचारात नघेत मुदतीत नियमान्वयेच्या कोणत्याही कार्यवाहीची पूर्तता न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अधोगती व आत्महत्या
सुरूच असून त्याबाबीस मा. उपसचिव सो.. ( पणन ) , सहकार व पणन विभाग, मंत्रालय , मुंबई हेच सर्वस्वी
जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून देत दिनांक ०६ फेद्धवारी २०२५ रोजीच्या पत्राद्वारे आपल्या कार्यालयात नियमांन्वयेच्या योग्य त्या उचित कार्यवाहीस्तव दिलेल्या स्मरणपत्र नं. ०६ अन्वयेच्या पत्रातील नमूद आशय आपण गांभी्यने विचारात घेत शेतकऱ्यांच्या अधोगतीसह आत्महत्येच्या बाबीस जबाबदार असलेल्या मा. उपसचिव ( पणन) , पणन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची रितसर आपणा स्तरावरून खातेनिहाय विभागीय चौकशी करत त्यांच्या सेवा पुस्तकात ही सदरच्या बाबीची नोंद घेत त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंदवून खटला चालविणेची परवानगी मिळावी, या आशयाचे मागणी पत्र गावराणी जागल्या सेनेचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!