अमळनेर, चारचाकीने रिक्षाला धडक दिल्याने एका तरुण रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि २० रोजी पहाटे साडे सात वाजेच्या सुमारास मंगरूळ गावा जवळील एका ढाब्याजवळ घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

सविस्तर वृत्त की, शहरातील ताडेपुरा भागातील रहिवाशी भटू पाटील (वय २९) नामक तरुण आपल्या रिक्षाने लोंढवे येथे पॅसेंजर सोडायला गेला होता. तो परत अमळनेर येत असताना धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकीने भरधाव वेगाने येऊन सदर रिक्षाला जोरात धडकदिल्याने तो तरुण रिक्षा चालक जागीच ठार झाला.या बाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवील असून चारचाकी चालक अविनाश भैय्यासाहेब पाटील (रा. दहिवद) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) ,२८१, १२५ (अ),१२५(ब),३२४(४) ,मोटरवाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.
