उल्हासनगर प्रतिनिधी, येथील रुगणांवर उपचार करताना डॉक्टरांकडून आतापर्येत अनेक धक्कादायक घटना घड़ल्या आहे. ऑपरेशन वेळी कधी पोटात टॉवेल राहणे, तर कधी कैची राहणे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, आता असा भयंकर प्रकार समोर आला,की डॉक्टरांनी जिवंत माणसालाच थेट मृत म्हणून घोषित केले होते.

उल्हासनगरमधील एका रुगणालयातून भयंकर प्रकार समोर आला आहे. व्यक्तीला मृत घोषित करून डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अभिमान तायडे वय ६५ वर्षे या जिवंत असलेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिले आणि मृत घोषित केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे वैद्याकीय क्षेत्रातील निष्काळजी पणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर या प्रकारा मुळे रुगणाच्या जीवाशी खेळणार्या डॉक्टर विरोधात नेमकी काय कारवाई होईल, याकड़े सर्वाचें लक्ष लागले आहे.
