अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तालुका स्तरीय आढावा बैठक सपन्न…

अमळनेर,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पारश्वभूमीवर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष डॉ बी एस पाटील यांच्या अध्यक्षते खाली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न.

 सविस्तर वृत्त की, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी बाबत न्यायालयाच्या दणक्याने राज्य सरकार व निवडणूक आयुक्त एक्शन मोड आले आहे. राज्यात वार्ड रचना सह मतदार नोंदणीला जोर धरला आहे.यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारीला लागल्याचे चित्र उभे राहिले आहे. आरोप प्रत्यरोपाच्या झडी सुरु झाल्या आहेत तर पक्षातंराचे वावटळ उठले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकी बाबत बैठका सुरु झाल्या आहेतं. याच पारश्वभूमीवर अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तालुका स्तरीय बैठक प्रदेश उपाध्यक्ष डॉ बी एस पाटील यांच्या अध्यक्षते खाली आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पक्षवाढी संदर्भात चर्चा करण्यासाठी घेण्यात आली.यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक आणि पक्षवाढी संदर्भात डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

या बैठकीस ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, मनोहर निकम, कमल आक्का, अनंत निकम, ॲड. शकील काझी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सुरवातीला प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी.एम पाटील यांनी तर सूत्रसंचालन डी.ए. पाटील केले. आभार शहराध्यक्ष प्रशांत निकम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!