सरकार महायुतीत ! ड्रग़्ज, दारू, जुगार, मटका, गुटखा, रेती, अवैध वेवसाय बद्दल महायुती सरकारमध्ये असलेले लोकप्रतिनिधी विरोधी पक्षात असताना अवैध व्यवसायाविरुद्ध जनतेची दिशाभूल करीत होते का?
बाजारात गाढव, बैल, रेड्या बकऱ्यांचेही चांगले भाव येतात. पण येथील पत्रकारांचे भाव राजकीय नेत्यांनी भंगार बाटल्या रद्दीच्या भावात ठरविले. आणि यामुळे सामाजिक सत्यता ” भ्रष्टाचार अत्याचार यामध्ये अडकली !
पूर्वी समाजाला भूरट्या चोरांची, दरोडेखोर, खिसेकापूंची भिती वाटायची आता पैशासाठी हपापलेल्या पत्रकारांची भ्रष्टाचार अवैध व्यवसायीकांशी उघड मैत्री वाढल्याने समाजाला ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांचीच भीती वाटत आहे.
पत्रकारांपासून, राजकीय नेते, सामाजिक नेते निवडणूकीत विकले गेले तर ती सामाजिक बांधीलकी, आणि गरीब, शोषीत, पीडीत, अर्धशिक्षित, अशिक्षित मतदार विकले गेले तर ती सामाजिक विकृती?
अवैध अमली पदार्थ ड्रग़्जपासून दारू गुटखा मटका जुगार अवैध व्यवसायांबाबत वृत्तपत्र सोशल मिडीयापासुन न्यूज चँनेलवरून बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या त्या पत्रकारांचे आता भागविलेय का?
नवे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरूद्ध कडक कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले.यावरुन वृत्तपत्र मिडीया सोश़ल मिडीया अवैध व्यवसायाविरूद्ध आक्रमक झालेली दिसली नाही.याउलट अवैध व्यवसाय बंद पडल्यास जिल्हयातील बाजारपेठा उद्योग व्यवसायांवर कसा परिणाम होतो यावर चर्चा अधिक झा़ली आणि हे वास्तव आहे. सावंतवाडीसह प्रमुख शहरांमध्ये पालकमंत्री नितेश राणे अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मोठा फरक पडल्याचे उघडपणे दिसू लागले. यामागचे मुख्य कारण सिंधुदूर्ग जिल्हातील बेरोजगारी होय. आता जिल्ह्यातील जनते़शी अवैध व्यवसायच अंगवळणी पडलाय कूठल्याही राजकीय सामाजिक संघटनेला या अवैध व्यवसायावर सरकारने बंदी घालावी असे वाटत नाही कारण अवैध व्यवसायच येथील बेरोजगारीचा प्रश्न सोडवत तर आहेच” शिवाय बाजारपेठांमधील उलाढालही वाढवित आहे आणि अशा अवैध व्यवसायामुळेच पोलीस यंत्रणेला बारीक सारीक विषयांवरुन राजकीय सामाजिक नेत्यांचे टोमणे ऐकूण घ्यावे़ लागतात आणि आपल्या कर्तव्यांशी तडजोड करावी लागत आहे तर वरिष्ठांच्या इशाऱ्यावर मनाला न पटणाऱ्याही बाबी स्विकाराव्या लागत आहे आणि अवैध व्यवसायांच्या आड मोठी मालमत्तादेखील परप्रांतीय मंडळीनी या जिल्ह्यात खरेदी केली आहे. यामध्ये कुणी कुणाला दोष द्यायला हवा. परप्रांतीय लोंढे येथे आल्यावर फेरीवाले म्हणून येतात आणि अवैध व्यवसाय बेधडक करून करोडपतीचे मालक बनले तरी चालतात पण येथील स्थानिक बेरोजगार आपला वडापावचा स्टाँल लावायला गेला की येथील राजकारण पत्रकारिता यांची पोटदुखी भलतीच वाढते.आता पत्रकारिता हा झटपट श्रीमंत व्हायचा व्यवसायच बनत चाललाय.अनेकानी सोशल मिडीयावरून चँनेल काढून तर पत्रकारीतेचा उघड बाजारच मांडल्याचे चित्र आपण पहातोय.आता पाहू जिल्ह्यात वाढीस लागलेले ड्रग़्ज अमली पदार्थ आदी अवैध व्यवसाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूणांचे भवितव्य कसे काय बनवतेय! आता सरकार महायुतीत अवैध व्यवसाय महाग चालल्याचे चित्र पहायला मिळतेय ? आता मतदार राजा तूझी कींमत पून्हा ठरणार “हजार – दोन हजार – पाच हजार” म्हणजे गाढवा रेड्या बैलाच्या कीमती पेक्षाही नगण्य.यासाठीच का मिळविल होत का स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांनी ?*
निबा पाटील,अमळनेर
90821 80455
