अमळनेरातील या तीन उपकेंद्रानां गुणवत्तेच्या आधारावर मिळाले राज्यस्तरीय ‘एनक्यूएएस’ प्रमाणपत्र…

    अमळनेर :केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांनुसार एनक्यूएएस करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मूल्यांकनात अमळनेरातील प्रा आ केंद्र जानवे,उपकेंद्र शिरुड (90%) रानाईचे (80%)या तीन आरोग्य उपकेंद्रांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करत राज्यस्तरीय एनक्यूएएस प्रमाणपत्र मिळविले आहे.

     जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात विविध सुधारात्मक आलेल्या उपाय योजनांना मोठे यश मिळाले आहे.

     मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली. आरोग्य सेवा गुणवत्ता,रुग्ण सुरक्षितता, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण,औषधांची उपलब्धता,रुग्ण समाधान,इमारत तसेच कार्यालयीन व्यवस्थापण अश्या आठ निकषावर तपासणी करण्यात आली.या सर्व निकषाची अमलबजावणी करत या तीन उपकेंद्रानी आपला ठसा उमटवला.

   या नामांकना मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित व विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाचे प्रभावी नियोजन, काटेकोर अंमलबजावणी तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका व इतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे हे यश मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या यशामुळे जिल्ह्यातील इतर आरोग्य उपकेंद्रांनाही गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणा मिळणार असून, आगामी काळात आणखी उपकेंद्रे एनक्यूएएस मानांकन प्राप्त करतील,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!