महसूल कर्मचाऱ्यांनी तीन वाळू माफियांच्या आवळल्या मुसक्या..

अमळनेर प्रतिनिधी, येथील मौजे मुड़ी प्र.डांगरी येथे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे तसेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रेक्टर मालक मनोज देडगे,शुभम सूर्यवंशी,सुनील भील आढळल्याने पकडण्यात आले. सदर ट्रेक्टर मुद्देमालासह अमलनेर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले.

     सदरची धाडसी कारवाई करण्यात महसूल विभागाचे श्री.पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी वावडे भाग), श्री. व्ही. पी.पाटील (मंडळ अधिकारी नगांव,) श्री.ऐ बी सोनवणे (ग्राम महसूल अधिकारी अमळनेर,) श्री.आशिष पारधे (ग्राम महसूल अधिकारी सारबेटे,) जितेंद पाटील (ग्राम महसूल अधिकारी शिरसाले बु), श्री.एम आर पाटील (ग्राम महसूल अधिकारी जैतपीर~मांडळ) हे होते.

या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!