महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या चारुदत्त पाटील नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल..

अमळनेर झाडी येथील ३७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी चासरूदत्त विलास पाटील (वय ३७, रा. झाडी, ह.मु. कुन्हा काकोडा, ता.मुक्ताईनगर) याच्यावर गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील झाडी गावातील एक महिलेची संशयित आरोपी चारूदत्त याच्याशी २००८ मध्ये ओळख झाली होती. पीडित महिलेचा पती दारूच्या आहारी गेलेला असल्याने चारूदत्तने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.महिलेने नाशिक येथे पतीसोबत राहायला गेल्यानंतरही आरोपीने तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवला.काही काळानंतर त्याला मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा येथे नोकरी मिळाल्याने तो तेथे निघून गेला.मात्र, त्याने महिलेचे फोन उचलणे बंद केले.यामुळे पीडित महिलेने प्रत्यक्ष जाऊन जाब विचारला असता, त्याचे इतर महिलांसोबतही अवैध संबंध असल्याचे आढळले. तसेच त्याने लग्नास नकार देत तिच्याशी गैरवर्तन केले व शिवीगाळ करत मारहाण केली.
त्रासाला कंटाळलेल्या महिलेने नाशिक येथील गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, सदर तक्रार दि ६ फेब्रूवारी रोजी मारवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!