अमळनेरात माता रमाई आंबेडकर जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी..

अमळनेर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई जयंती अमळनेर तालुक्यासह शहरी भागात मोठ्या आनंद उत्साहाने साजरी करण्यात आली.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’ ही एक अतिशय लोकप्रिय आणि जुनी म्हण आहे. परंतु अनेकदा प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांच्या आयुष्यात यशाचा आधार ठरलेल्या महिलांचे, विशेषतः त्यांच्या जीवनसाथींचे योगदान कमी-अधिक प्रमाणात विसरले जाते. काही वेळेस ते लक्षातही ठेवले जाते, असेच एक उदाहरण म्हणजे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,संविधान निर्माते आणि भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर हे होय.

रमाबाईंचा जन्मबालपण :
माता रमाई आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत होते. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ होता. रमाबाईंचा विवाह १४ वर्षीय भीमराव आंबेडकर यांच्याशी १९०६ मध्ये वयाच्या ९व्या वर्षी झाला. वयाच्या ९व्या वर्षापासून सुरू झालेली संघर्षातील भागीदारीची ही प्रक्रिया ९ मे १९३५ रोजी रमाबाईंच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू होती. बाबासाहेबांनीही रमाबाईंचे आपल्या जीवनातील योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. रमाबाईंनी त्यांचे पती डॉ. आंबेडकरांना प्रत्येक संघर्षात पूर्ण साथ दिली. शेणाच्या गौऱ्या घरोघरी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न रमाबाई करत असत काम करून बाबासाहेबांच्या शिक्षणाचा खर्च भागवत असे.

मारवाड या गावी माता रमाई जयंती साजरी..
अमळनेर तालुक्यातील मारवाड या गावी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामस्थ व समाज बांधवांच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली होती, सदर कार्यक्रमात अमळनेर येथील भंते रक्षित
बुद्धाचार्य हरिभाऊ वाघ, प्रविण बैसाणे, कृष्णकांत शिरसाठ, भैय्यासाहेब सैंदाणे, आत्माराम अहिरे, ग्रामस्थ छायाबाई पानपाटील, लताबाई पान पाटील, यमुनाबाई पानपाटील, शांताबाई पानपाटील, निर्मलाबाई वानखेडे, मंगलाबाई पानपाटील, शोभाबाई शिरसाट, मायाबाई बैसाणे, सरलाबाई घोलप, रेखाबाई पानपाटील, शालुबाई पानपाटील, सुनंदाबाई गायकवाड, आरती शिरसाट, प्रभाकर पानपाटील, संतोष पानपाटील, मुकेश बैसाणे, विजय पानपाटील, पंडित पानपाटील, शिवा पानपाटील, अंकुश पानपाटील, गौतम मोरे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताडेपुरा भागात माता रमाई जयंती साजरी

अमळनेर शहरी भागातील ताडेपुरा भीम नगर या भागात युवकांतर्फे माता रमाई जयंती जयंती साजरी करण्यात आली, सदर कार्यक्रम संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती होती, माता रमाई यांना अभिवादन करून डीजे वाजवत महिला पुरुषांनी जयंतीच्या आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.

गलवाडे रोड माता रमाई नगर येथे अभिवादन सभेचे आयोजन..

गलवाडे रोड येथील माता रमाई नगर या परिसरातील रहिवासींनी एकत्र येऊन त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली, माता रमाई यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली होती त्यावेळी बालकृष्ण जाधव, शांताराम संदानशिव,दिनेश बिऱ्हाडे, प्रेम बैसाणे,महेंद्र अवचरे,विनोद बिऱ्हाडे ,तात्या चव्हाण ,प्रकाश जनजाले,निगम सर ,अभय मोरे ,नंदू संदानशिव, विजय सपकाळे, मनोहर सैंदाणे, दिनेश पाटिल, दिलीप कोळी, प्रकाश बनसोडे,गोकुल बिऱ्हाडे, कुंदन सोनवणे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!