शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

 अमळनेर  : नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर चौधरी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित प्राध्यापक, ग्रंथपाल व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले.

याप्रसंगी प्रा. डॉ. नयना वाणी, प्रा. डॉ. पाचपांडे, प्रा. डॉ. जितेश चव्हाण, प्रा. डॉ. सुनंदा तायडे, प्रा. संगीता पाटील, प्रा. कैलास देवरे, ग्रंथपाल डॉ. विजय गाढे, सहायक ग्रंथपाल वनिता पाटील, शिक्षकेतर कर्मचारी कैलास भोंगळ, किरण रावळं आदी उपस्थित होते.

यावेळी आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. प्रभाकर चौधरी यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या देशसेवेतील योगदानाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्यनिष्ठेतून आदर्श निर्माण केला.

आजच्या तरुणांनी महात्मा गांधी यांच्याकडून अहिंसेचा आणि लालबहादूर शास्त्री यांच्याकडून देशाप्रती कर्तव्यनिष्ठेचा गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. या दोन्ही महापुरुषांचे विचार आणि कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून युवकांनी त्यांच्या आदर्शांनुसार आपले जीवन घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महापुरुषांच्या विचारांचे स्मरण आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याच्या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!