झाडीत रंगला ‘तृतीयरत्न’चा वारसा: ज्येष्ठ रंगकर्मी आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करत फुले जयंती उत्सवाचा प्रारंभ

     अमळनेर :कळमसरे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतकीय जयंती वर्षाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ, अमळनेर तालुक्याच्या वतीने झाडी येथे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आखाजीच्या पूर्वसंध्येला, १८ एप्रिल २०२६ रोजी शिरपूर येथील प्रसिद्ध अहिराणी एकपात्री नाट्य कलावंत प्रवीण माळी यांचा ‘आयतं पोयतं सख्यानं’ हा प्रबोधनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

बळीराजाच्या हस्ते उद्घाटन

      कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे याचे उद्घाटन एका सामान्य शेतकऱ्याच्या हस्ते करण्यात आले. श्री. वसंतराव साहेबराव पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, तर अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक भास्करराव साहेबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त एलआयसी शाखाधिकारी सदानंद अहिरराव उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, अभियान प्रमुख प्रा. डॉ. लीलाधर पाटील व प्रा. डॉ. विलास पाटील यांच्या संकल्पनेतून हा नियोजनबद्ध सोहळा पार पडला.

नाट्य परंपरा आणि स्त्रीशक्तीचा गौरव

   महात्मा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ नाटकाद्वारे सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली होती. याच वारशाचा आदर करत गावातील ज्येष्ठ नाट्य कलावंतांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये: सुभाष श्रीराम पाटील, लोटन राजाराम पाटील. गणेश विठ्ठल पाटील. मोगल रुस्तम पिंजारी. रामकृष्ण दयाराम पाटील तसेच, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचाही ‘कार्य गौरव’ करण्यात आला. यात मुख्याध्यापिका श्रीमती उषाताई भदाने, बचत गट प्रमुख सुषमा पाटील, शेतीदूत प्रतिभा पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा समावेश होता.

मान्यवरांची मांदियाळी

      या सोहळ्याला संविधान जागर अभियानाचे प्रा. अशोक पवार, ‘गावरानी जागल्या सेना’ अध्यक्ष विश्वास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या वसुंधराताई लांडगे, सीमाताई रगडे, बापूराव ठाकरे, महेशकुमार पारेराव, पत्रकार मिलिंद पाटील यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुणाईचा सक्रिय सहभाग

     मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड, शाखा झाडी यांना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील गणेश मित्र मंडळ, महाकाल मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ आणि वीर एकलव्य मित्र मंडळाच्या तरुणांनी मोलाचे सहकार्य केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. राकेश पाटील सर यांनी मानले. या उपक्रमामुळे परिसरात वैचारिक जागृती निर्माण झाली असून, वर्षभर तालुक्यात असे विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!