जळगाव: आपल्या अभ्यासू, संयमी आणि तितक्याच कर्तव्यदक्ष कार्यपद्धतीमुळे ओळखले जाणारे धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्याला एक शिस्तप्रिय आणि अभ्यासू अधिकारी लाभला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक वृद्धिंगत झाली आहे.

