नेवासा मुख्याधिकाऱ्यांवरील प्राणघातक हल्ल्याचा अमळनेर नगरपालिकेत तीव्र निषेध; मुख्यमंत्र्यांना निवेदन

      अमळनेर: महाराष्ट्रभर सध्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, नुकत्याच अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील नेवासा येथे घडलेल्या थरारक घटनेने राज्यभरातील प्रशासकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. नेवासा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर उपनगराध्यक्षांच्या पतीने गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ अमळनेर नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जाहीर निषेध सभा घेतली.

नेवासा येथील घटना काय?

​      नेवासा नगरपरिषदेत उपनगराध्यक्षांच्या पतीने थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिरून त्यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. सुदैवाने, मुख्याधिकारी वेळीच खाली वाकल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कामाची मानसिक स्थिती बिघडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

अमळनेर नगरपरिषदेचा आक्रमक पवित्रा

​      या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे आणि उपमुख्याधिकारी श्री. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची निषेध सभा पार पडली. यावेळी कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

​या प्रमुख मागण्यांचे निवेदन खालील मान्यवरांना पाठवण्यात येणार आहे:

​मा. नामदार एकनाथराव शिंदे (मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री)

​आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, नवी मुंबई

​मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर

​मा. जिल्हाधिकारी, जळगाव

​निवेदनावर ‘या’ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या

​या निषेध निवेदनावर नाशिक विभाग संघटना अध्यक्ष सोमचंद संदानशिव, विनोद पाटील, शाम कदम (आस्थापना), संदीप पाटील (संगणक), भाऊसाहेब सावंत (दवाखाना), अजित लांडे, प्रवीण कुमार बैसाणे (अभियंता), संतोष माणिक, संतोष जाधव (आरोग्य निरीक्षक), सचिन कदम, मदन पाटील, जयेश जोशी, हरीश पाटील, मिलिंद चौधरी, चंदन पाटील, रामोळे, संतोष केदारे, सतीश बडगुजर, विजय बागुल, विजय भालेराव, रवींद्र उदेवाल, रोहिदास माळी, दिनेश पाटील, मनोज सोनार, प्रवीण शेलकर, विजय साळुंखे, आनंद बिऱ्हाडे, गणेश ब्रम्हे, इक्बाल पठाण, निलेश संदनशिव, पुनम चौगुले, सगुना बारेला, अरुणा बहारे, विजय महाजन, प्रमोद लटपटे, प्रसाद पाटील, निखिल संदानशिव, राजेंद्र वानखेडे, रवींद्र मराठे, सलीम पठाण, सुनील पाटील, योगेश संदानशिव, जितेश संदानशिव, हेमंत गजरे, मोहित मेराळे, संजय माळी, योगेश पाटील यांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

“शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे जीवघेणे हल्ले होणे ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे. हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत किंवा अत्यंत कठोर कलमान्वये कारवाई झालीच पाहिजे, तरच कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकून राहील.” > — अमळनेर नगरपरिषद कर्मचारी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!