क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा लाभाच्या योजनेच्या अनुदान खोळंब्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन…

 

अमळनेर तालुक्यातील सरकारच्या लाभाच्या योजनेतील अनियमितता विरोधात तहसील कार्यालया समोर क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केले बोंबा बोब आंदोलन.

     सविस्तर वृत्त की, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नाव बदलून केंद्र सरकारने जी रामजी योजना सुरू केलेले आहे या योजने अंतर्गत तालुक्यात शेतकऱ्यांनी 273 सिंचन विहीर,148 गोठा शेड,27 शोच खड्डा,3817 घरकुल बांधून झाले असून अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही.तसेच सदर लाभार्थ्यांना कुशल कामासाठी व अकुशल कामासाठी मजुरीचे अनुदान वेळेत पूर्ण मिळेल नाही. तो लाभ मिळावा तसेच संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजना,इंदिरा गांधी या योजनेचा लाभार्थ्यांना डीबीटीच्या नावाखाली हजारो लाभार्थ्यांना त्यांच्या लाभांपासून वंचित ठेवले असल्याने त्यांना सदर योजनेचा तात्काळ लाभ मिळावा,तसेच हे सर्व लाभार्थी शेतमजूर वर्ग असून त्यांना लाभापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यास अडचणी निर्माण येत असला मुळे त्यांना तात्काळ सदर योजनेचा लाभ मिळावा, याकरता शासनाचे लक्ष वेधण्याकरता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अमळनेर तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.संघटनेच्या माध्यमातून अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

आंदोलनाचे विषय :-
केंद्र व राज्य सरकारने घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे द्यावयाचे शासकीय अनुदान त्वरित वाटप करावे,

विधवा परितक्त्या ज्येष्ठ महिला व पुरुष यांच्यासाठी शासनाने केलेल्या सुरू केलेल्या योजना उदा.संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजना,इंदिरा गांधी योजनेचा लाभ तात्काळ मिळावा,

शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसान भरपाई पोटी शासनाने त्वरित पीक विम्याची रक्कम द्यावी,शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदानाचे शासनाने दिलेले अनुदान त्वरित वाटप करावे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शरद पाटील,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलीप पाटील,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील,विश्वास पाटील, अरुण गव्हाणे,पंकज निकम, प्रवीण बोरसे,अशोक मोरे, नरेश चव्हाण, जयेश कोळी, गोकुळ बोरसे, विनोद पाटील,विजय पाटील,रतिलाल पाटील,अरुण गव्हाणे, योगीराज कोळी,दीपक पाटील,शंकर खैरनार, उमेश पाटील,बन्सीलाल पाटील,रोशन ठाकरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!