अल्पवयीन मुकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी दिपक भिल यांस न्यायलयाने ठोठावली 20 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा…..

अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील ढेकू बु. गावातील मुख्यमंत्री बधिर मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली तब्ब्ल 20 वर्ष सश्रम कारावास.

      सविस्तर वृत्त की, तालुक्यातील ढेकू बु. गावांत राहणाऱ्या दिपक नाना भिल याने त्याच गावातील अल्पवयीन मूकबधिर मुलीवर तिच्या मर्जी बगैर घरा शेजारी वं शेतात वारंवार शारीरिक संबंध केले असता तिला गर्भवती केले. ही बाब पीडित मुलीच्या आई वडिलांच्या लक्षात येताच दिपक भिल याच्या विरोधात मुलीच्या वडीलांनी अमळनेर शहर पोलिस स्टेशन येथे दिनांक 30.01.2022 रोजी सदर आरोपी विरुध्द शहर पो. स्टे. गु.र.न. 45 / 2022, स्पेशल पोक्सो केस नं. 09/2022,गुन्हा कलम 376 (1), (जे), (एल), (एन), 376 ड, 354 (अ) सह भा.द.वि. व पोक्सो अॅक्ट 4,5 (जे) (2), (के),(एल), 6, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

     सदरचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. नरसिंह वाघ यांच्या कडे सोपविण्यात आल्याने त्यांनी अगदी बारकाईने कोणाच्याही दबावात नयेता पीडित मुलगी मुक बधिर असल्याने तपासकामी मूक बधिर शाळेतील शिक्षकांच्या मदतीने तपास करून न्यायालयात सादर केला. याकामी त्यांची तब्बल तीन दिवस साक्ष चालली.सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद करून सदर गुन्हा साबीत केला. मे कोर्टाने आरोपीस सदरच्या खटल्या कामी आलेल्या पुराव्या वरून आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द झालेने मे कोर्टाने आरोपीस भा.द.वि कलम 376 ( 2 ) (एन) तसेच बालकांचे लैगिक आत्याचारापासुन संरक्षण कायदा कलम 6 प्रमाणे दोषी धरण्यात आले. त्या प्रमाणे मे. कोर्टाने आरोपीस भा.द.वि कलम 376 ( 2 ) (एन) या कलमात व तसेच पोक्सो अॅक्ट 6 प्रमाणे 20 वर्षे कारावास व 10 हजार रू दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी 7 हजार रू. पिडीतेस देण्याचे आदेश मे कोर्टाने केले. सदर आरोपी हा खटला चालत असताना अटक झाल्यापासून कारागृहात होता. 

    सदर खटल्या कामी मा. तदर्थ अति. सत्र जिल्हा न्यायाधीश श्री. एल. डी. गायकवाड साहेब यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले त्यात सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल यांनी सरकार पक्षातर्फे एकुण 09 साक्षीदार तपासण्यात आले.पीडित विशेष बालकाची साक्ष ही व्हिडिओग्राफी व्दारे बंद दरवाज्यात नोंदविण्यात आली. विशेष शिक्षक यांनीच त्या पिडीतेस इयत्ता 6 वी पावेतो बोलणे ऐकणे व समजुन घेण्याचेशिकविलेले होते. याकामी पिडीत मुलीच्या साक्षेनंतर पिडीता ही आरोपीता पासून साडे पाच महिन्याची गर्भवती राहीली होती. त्याकरिता पिडीताची आई, पोलीस पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. जी. एम.पाटील व डॉ. अनिता देशमुख यांची साक्ष देखील महत्वाची ठरली. त्यावरून पिडीताच्या पोटात असलेले हे आरोपीताच्या डि.एन.ए अहवाल जोडून आल्याने व पिडीता ही वयाने 16 वर्ष असल्याबाबतचा जन्मतारखे बाबतची साक्ष देखील महत्वाची ठरली. या कामी झालेल्या पुराव्याचा आधार घेवुन सरकारी अभियोक्ता अॅड. के. आर. बागुल यांनी प्रभावी युक्तीवाद केल्याने सदर आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली.

    या खटल्यात चौकशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक श्री. नरसिंह वाघ वं सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!