अमळनेर शहर प्रतिनिधी,येथील पातोंडा गावचे रहिवासी असलेले प्रशांत वाडीले व करण पवार ह्या दोन्ही तरुणांची भारतीय सैन्य दलात निवड झाली.तसेच मठगव्हाण येथील तरुणी राजनंदिनी पवार ह्या तरुणीची देखील सैन्य दलात निवड झाली आहे.
सविस्तर वृत्त की,नुकताच एसएससी (जीडी) ह्या कठोर परीक्षेचा निकाल लागला त्यात पातोंडा येथील प्रशांत वाडीले याची केंद्रीय राखीव पोलीस बल तर करण पवार याची बीएसएफ ह्या सैन्यदलात निवड झाली.दोन्ही तरुणांची परिस्थिती हलाखीची असून त्यांनी मेहनत व अभ्यासाच्या जोरावर अंत्यत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे.दोन्हीही तरुण पातोंडा परिसर विकास मंच अभ्यासिकेतील विद्यार्थी होते.तसेच मठगव्हाण येथील तरुणी राजनंदिनी पवार हिची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड झाली आहे. या चारही तरुणांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आदर्श समाजसेविका सौ रिताताई भूपेंद्र बाविस्कर यांनी गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना बॅग तसेच शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
या प्रसंगी जवानांच्या सत्कारासाठी गावातील ग्रामस्थ मंडळी तसेच त्या जवानांचे आई-वडील देखील उपस्थित होते.
कार्यक्रमास कपिल पवार, विलास सर, सौ वैशाली पवार, नितीन पारधी,अशोक पवार, भरत बिरारी, सोपान लोहार, सुनील पवार, प्रशांत पवार, अमित पवार, रमेश संदांशिव,संजय पवार,अनिल पवार, सौ छाया वाडीले, सौ मंगला भोई, सौ आशा भोई,करण पवार व त्यांचे वडील अनिल पवार , प्रशांत वाडीले व त्यांची आई संगीता राजेंद्र वडीले तसेच पातोंडा परिसर विकास मंचातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
अमळनेर”घर संसार” अहिराणी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता, तसेच लोक न्यूजचे संपादक संभाजी देवरे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अमळनेरमध्ये आयोजित…