दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट बातम्या व जाहीरात व्यवसाय करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार…संपादकीय विभागात प्रथम एरंडोलचे तालुका प्रतिनिधी कमरअली सय्यद, द्वितीय अमळनेरचे शहर प्रतिनिधी डॉ विजय गाढे

जळगाव- येथील पद्मालय विश्रामगृहामध्ये झालेल्या दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये ग्रुप प्रेसिडेंट तथा महाव्यवस्थापक उमेश सापधारे सर यांच्या हस्ते व आवृत्ती संपादक मनोज बारी यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे प्रतिनिधी व वार्ताहर यांचा गणरायाची आकर्षक मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये संपादकीय विभागात प्रथम एरंडोलचे तालुका प्रतिनिधी कमरअली सय्यद, द्वितीय अमळनेरचे शहर प्रतिनिधी विजय गाढे, ग्रामीण विभागातून पिंपळगाव हरेश्वरचे प्रतिनिधी किशोर लोहार. जाहिरात विभाग प्रथम पाचोरा तालुका प्रतिनिधी शांताराम चौधरी, द्वितीय पारोळा तालुका प्रतिनिधी दिलीप सोनार व ग्रामीण विभागातून प्रथम पाळधीचे प्रतिनिधी गोपाळ सोनवणे आदी.

यावेळी धुळे जिल्हा प्रतिनिधी दिनेश रावल, भुसावळ कार्यालयाचे प्रमुख प्रेम परदेशी, जळगाव जाहिरात विभागाचे सुनील भावसार व जिल्ह्यातील प्रतिनिधी व वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!