मी कार्यकर्ता,माझी भुमिका – नींबा पाटील, सामाजिक कार्यकर्त

     विशेष लेख……

    मी कार्यकर्ता,माझी भुमिका, मी पक्षासाठी अहोरात्र झगडत असतो, गावागावात सामान्य जनतेचे प्रश्न सोडवतो, शहरात नगरपालिका व नगरपंचायत अधिकारातील प्रभागात जावून जनतेच्या प्रश्नांना ची उत्तरे देण, त्याच्या समस्या समजावून सोडवणे उदाहरण पाण्याचं, रस्ता, विज, गटार ही कामे वर्षानुवर्षे करतो,

काही प्रश्न मी माझ्या अखत्यारीत असल्याने ते सोडून काम मार्गी लावतो, जी कठीण असतात ते माझ्या वरीष्ठ नेत्यांच्या मदतीने जनसामान्यांना समाधान मिळवून देतो, मग निवडणुका आल्यावर जर मी तिकीट मागितले तर गुन्हा आहे का,? येणे वेळी तुम्ही बाहेरच्या माणसाला तिकीट देवून निष्ठावंत कार्यकर्ते कसे रहातील तुमच्या बरोबर, ज्या व्यक्तींचे पक्षासाठी काहीही योगदान नाही, आंदोलन, मोर्चा, किंवा पक्ष बांधणीसाठी काडीमात्र संबंध नसताना त्यांना तिकीट, पद, खुर्च्या दिल्या जातात, मग कार्यकर्त्यांनी पुढे जायचं नाही का,? आमच्या ही विच्छा आकांक्षा आहे हे जर आमच्या आमदार व खासदार यांना कळत नसेल तर अशा स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या मागे हुजरेगिरी करून काय फायदा, तुम्ही घराणे शाही करून बायको मुलांना तिकिट देतात, मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही कि माझा कार्यकर्ता सुध्दा मोठा व्हावा, आम्ही येवढी पक्षासाठी मेहनत करून जर हातात धंतुरा मिळत असेल तर आग 🔥 लागो तुमच्या सहानुभूतीची दाखवायची, आम्ही किती बुक्यांचा मार खावा, तुमच्या साठी आम्ही पोलिस केसेस अंगावर घेतो, तुमच्या साठी जनतेबरोबर भांडतो, आमदार खासदारां नो ऐन वेळी आमचं तिकीट कापून दुसऱ्याला देणं १००% चुकीचं आहे, तुम्ही आमदार व खासदार म्हणून निष्ठावंत कार्यकर्ता वर अन्याय करत आहे, तो तुमचा लाभार्थी आहे का,? निष्ठावंत कार्यकर्ता डावलून ऐरेगेऱ्याला तिकीट देवून तुम्ही आमच्या कार्यकर्त्याचा अपमान केला, आमचं मण दुखलं, म्हणून मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला गद्दार म्हणून संबोधले आहे, आमच्या निष्ठेची चेष्टा केली आहे, कारण तुम्ही कार्यकर्ते ओळखले नाही, कुठल्याही क्षेत्रांतील माणसाला उचलून त्याला तिकीट देतात अईन वेळेस, मी कार्यकर्ता म्हणून तमाम जनतेला अपील करतो की अशा खुर्च्या साठी हायमारी करणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवकाला मतदान करू नका, मतदानाचा हक्क बजवा प्रसंगी शेवटचं बटन नोटा असतं ते दाबा म्हणजे नेत्याला कळेल निष्ठावंत कार्यकर्ते काय करू शकतो.

लेखक -नींबा पाटील, सामाजिक कार्यकर्ते 

+919082180455

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!