अमळनेर येथील ए बी ग्रुप या स्थानिक सामाजिक तरुणांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगणी माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 7 फेब्रुवारी रोजी माता रमाईची जयंती शहरातील फरशी रोड परिसरात ए बी ग्रुप या सामाजिक ग्रुपच्या तरुण मंडळींनी प्रबोधनात्मक व्याख्यान ठेऊन साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत खांद्याला खांदा लावून अपार कष्ट करून शोषित वंचीत अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी लढ्यात रमाईची मोठी साथ होती. त्यांनी केलेल्या त्यागा व परिश्रमाच्या परिणामी आज समस्त अस्पृश्य समाजाला मानवता व समानतेच्या जीवनात हक्क- अधिकार आणि प्रगतीची वाट रमाई ने केलेल्या त्यागाचा परिणाम स्वरूप आहे याची जाणीव यावेळी उपस्थित समाज बांधवांना करून देण्यात आली.
माता रमाई यांच्या या त्यागाचे स्मरण व अभिवादन करण्यास्तव ए बी ग्रुप अमळनेर शहर यांनी फरशी रोड येथील तथागत गौतम बुद्ध सांस्कृतिक केंद्र येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात समस्त आंबेडकरी युवा पिढी मार्फत माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतीस, विचारास पुन्हा नवचैतन्य देण्याच्या संकल्प आज सर्व समाज बांधवांकडून निश्चय केलेला आहे.
याप्रसंगी प्रा.जितेंद्र संदनशिव,विशाल सोनवणे,राज रामराजे,गौरव सोनवणे,अजय बी बिऱ्हाडे,धीरज ब्रह्म्हे,अजय बिऱ्हाडे,राहुल बिऱ्हाडे, दर्शन बिऱ्हाडे, अक्षय सोनवणे,सोनू बिऱ्हाडे,राहुल बिऱ्हाडे ,मोसीम बागवान,रुद्र सांदनशिव,इम्रान पठाण,विकी भोई, नमन नगराळे आदी समाज बांधव उपस्थित होते.
