अमळनेर प्रतिनीधी येथील पांझरा नदीत मजूरासह व बैल गाडी पाण्याच्या प्रवाहात उलटी झाल्याने पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पाण्यातून सुखरूप बाहर काढण्यात मिळाले यश.

सविस्तर वृत्त असे की,अमळनेर तालुक्याच्या शेजारी असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील शेतकर्यांची बरीच शेत जमीन ही अमळनेर तालुक्यातील तांदळी शिवारात येत असल्याने पढावद येथील शेतकऱ्यानां आपल्या शेतीची कामे करण्यासाठी दररोज पांझरा नदीत जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत असते. नदीवर पूल व्हावे म्हणून अनेकदा शेतकऱ्यांनी स्थानिक लोक प्रतिनिधींना सांगून सुध्दा अद्याप पूल होऊ शकला नाही.यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
दि 3 आक्टोंबर रोजी पढ़ावद येथिल सरपंच रवींद्र पवार यांची बैलगाडी मजूर घेऊन नदीच्या प्रवाहातून शेतात कामासाठी जात असताना अचानक नदीला जास्त प्रवाह आल्यामुळे व पाण्याच्या अंदाज व्यवस्थित नसमजल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे बैलगाडी पाण्यात उलटी झाली व जास्त पाण्यात बैलगाडी सह शेतमजूर वाहू लागले मजुरांनी आरडाओरडा केल्याने त्या ठिकाणी उपस्थित पोलिस पाटील ईश्वर पवार यांनी स्वतला पोहता येत नसताना गावकऱ्यांच्या मदतीने तात्काळ त्या शेतमजुरांना शर्तीचे प्रयत्न करून सर्व शेत मजुरांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठे अनर्थ टळले.
पोलिस पाटील ईश्वर पवार यांनी दाखवलेल्या हिम्मतीला पोलिस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष भूषण बोरसे, राजेंद्र पाटील,युवराज माळी,चरणसिंग गिरासे भैया नगराळे आदींनी मनभरून कौतुक केले.
