अमळनेर : कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना *राष्ट्रहितातून समाजहित* या मुख्य विषयावर शिव चरित्रकार जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विद्यमान ११ वे वंशज ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांनी मार्गदर्शन केले.
प्रस्तुत समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण बी जैन हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक श्री हरी भिका वाणी हे उपस्थित होते.या प्रसंगी व्यासपीठावर खा.शि.मंडळाचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,उप प्राचार्य डॉ.कल्पना पाटील,डॉ.अमित पाटील,डॉ.व्ही बी मांटे उपस्थित होते.
प्रस्तुत समारंभाचे प्रास्ताविक प्रा.देवेंद्र तायडे यांनी केले.प्रा.तायडे यांनी कार्यक्रमाच्या मागील पार्श्वभूमी विशद केली,संत परंपरा व संस्कृती आणि समाजहित ते राष्ट्र विकास यांचा अनुबंध कसे जोडले पाहिजे या संबंधीचे प्रयोजन स्पष्ट केले.
डॉ.अरुण जैन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हणाले की,साधू संत येती घरा…तोची दिवाळी व दसरा असे मत व्यक्त करून संस्कृती व संस्कार हया मूल्यवान गोष्टी आहेत.म्हणून डॉ.जैन सर पुढे म्हणतात की, *संत जहाँ जाते है,वहा पर हर दिन त्योहार मनाया जाता है* म्हणून सद्यकालीन समाजातील प्रवृत्ती बदलण्याचे कार्य संतांचे आहे,असे व्यापक विचार मांडले.
ह.भ.प.शिरीष महाराज(मोरे) यांनी आपल्या भाषणात या वेळी खुर्चीचा मोह सोडून खाली बसणा-या विद्यार्थिनींचे कौतुक केले,विश्वाला कलाटणी देणा-या युवकांशी संवाद साधताना महाराज म्हणाले की,आजचा युवक म्हणजे उज्वल भवितव्य ठरविणारे आहे.म्हणून आपले आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम,स्वामी विवेकानंद,खुदिराम बोस,चंद्रशेखर आझाद हे आहेत,त्यांचे विचार व कार्य अभ्यासले पाहिजे.
सध्या समाज जीवनात जे अनुचित प्रकार घडत आहेत ते दुर्देवी असून संस्कृतीचे अध:पतन करणारे आहे म्हणून आपले संस्कार जपले पाहिजे.पुष्प की अभिलाषा,पक्षांची कविता या द्वारे *आग लगी वृक्ष को तो जलने की पाद* असे सांगून *धर्म हमारा यही है,हम जले ईसके साथ* या पंक्तीतून युवकांना चांगल्या परंपरेचे वारसदार व्हा,राष्ट्र निर्मितीत योगदान द्या असे भावनिक आवाहन या वेळी करण्यात आले.
ह.भ.प.शिरीष महाराज यांनी सामाजिक संदेश देताना विद्यार्थ्यांना सांगितले की, भारतात वृद्धाश्रमाची संख्या लक्षणीय आहे म्हणून प्रथम आई-वडिलांची सेवा केली पाहिजे,या वेळी महाराजांनी विद्यार्थ्यांना खालिल संकल्प करण्याचे आवाहन केले.उदा:
१) आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकणार नाही
२) जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन आम्ही एक आहोत,हे विचार स्वीकारावे.
महाराज पुढे म्हणतात की,सर्व प्रकारच्या भेदा पलिकडे जाऊन राष्ट्र निर्मितीसाठी योगदान द्या,राष्ट्र धर्म टिकवा याचप्रमाणे संस्कृती व परंपरेवर चालण्यासाठी सज्ज व्हा,असा संदेश यावेळी दिला.
प्रस्तुत कार्यक्रमासाठी डॉ.विजय तुंटे, डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.निलेश चित्ते,डॉ.एस बी नेरकर.माधव भुसनर,ग्रंथपाल दिपक पाटील सह अनेक प्राध्यापक वृंद उपस्थित होता. सूत्र संचालन व आभाराची जवाबदारी डॉ.धनंजय चौधरी यांनी पार पाडले.
