अमळनेर: ‘ईद-उल-फितर’ निमित्त शहरात विशेष स्वच्छता व पाणीपुरवठ्याची मागणी; नगरसेवक नाविद शेख यांचे प्रशासनाला निवेदन

       अमळनेर:आगामी पवित्र ‘ईद-उल-फितर’ (रमजान ईद) सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील मुस्लिम बहुल भागात विशेष साफसफाई, औषध फवारणी आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक नाविद शेख यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले आहे.

​निवेदनातील प्रमुख मागण्या:

विशेष साफसफाई: शहरातील सर्व मशिदी, ईदगाह मैदान आणि मुख्य रस्त्यांची तातडीने स्वच्छता करून साचलेला कचरा उचलण्यात यावा.

​जंतुनाशक फवारणी: डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागातील गल्लोगल्ली जंतुनाशक पावडर व धूर फवारणी (Fogging) करण्यात यावी.

​पाणीपुरवठा: ईदच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुरेसा आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करावा.

​पथदिव्यांची दुरुस्ती: रात्रीच्या वेळी नागरिकांची वर्दळ लक्षात घेता, बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत.

“ईदचा सण आनंदात आणि आरोग्यदायी वातावरणात साजरा व्हावा, ही आमची भावना आहे. प्रशासनाने संबंधित विभागाला तातडीने निर्देश देऊन या सुविधा पुरवाव्यात,” असे नाविद शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!