वकीलांना संरक्षण आधिनियम लागु करा…..अमळनेर वकील संघाने केली मागणी

अमळनेर येथील वकील संघाने वकिलांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वकील संरक्षण आधिनियम लागु करण्याची केली मागणी.

सविस्तर वृत्त की,अमळनेर येथील वकील संघाचे सभासद एड. प्रशांत आर. बडगुज़र यांचेवर उलटसुलट प्रश्न विचारला म्हणून समोरच्यांनी हल्ला करीत जखमी केले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर वकील संघाने या झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत व भारतीय वकील संरक्षण आधिनियम लागु करणेबाबतचे निवेदन प्रांताधिकारी, अमळनेर यांना देण्यात आले.

सदर च्या निवेदनात अमळनेर वकील संघाचे सदस्य एड.प्रशांत आर. बडगुजर यांचेवर काल दिनांक ০৪/০३/२०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजता न्यायदंडाधिकारी सो. वर्ग-१ यांचे कोर्ट हॉलबाहेर
विरूध्द पक्षकार राजेंद्र पवार व त्यांची बहिण मिनाक्षी भामरे यांनी भ्याड हल्ला केला.ह्याबाबतची सविस्तर गुन्ह्याची नोंद अमळनेर पोलीस स्टेशनला गु. र.नं. ८७ / २০२५ झालेली असुन सदर भ्याड हल्ल्याचा अमळनेर वकील संघाने तीव्र शब्दात निषेध ठराव पारीत केला असुन सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची व निंदनीय आहे. सदर घटनेतील आरोपी राजेंद्र पवार व मिनाक्षी भामरे यांना तात्काळ अटक करून कड़क कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश अमळनेर पोलीस स्टेशनला देण्यात यावे व भविष्यात अशा घटना होवू नये म्हणुन शासनाकडे प्रलंबीत असलेला भारतीय वकील सरक्षण अधिनियम तात्काळ लागू करण्यात यावा या बाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा,अश्या आशयाचे मागण्या नमूद केल्या आहे.

सदर निवेदना वर वकील संघाचे अध्यक्ष एड किरण पाटील,एड आर व्ही निकम,एड दिनेश पाटील,एड एस आर पाटिल,एड आर जी कच्छूवा, एड प्रशांत संदानशिव, एड अमोल ब्रह्मे,एड विजय संदानशिव,एड सलीम खान,एड रोहित ढिवरे,एड सुरेश सोनवने,एड प्रशांत बडगूजर,एड प्रदीप भंडारकर,एड विपिन परमार,एड पी डी पाटिल,एड बी एस चौहान,एड बी एस पाटील,एड कुलकर्णी,एड कुंदन सालुंके,एड नंदलाल सूर्यवंशी,आर एस माळी, एड जितेंद्र साळी, एड जयेश बडगूजर,एड यदनेश्वर पाटिल आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!