अमळनेर येथील माजी राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री आमदार अनिल पाटील यांना मंत्री पदाचा मुकुट बहाल व्हावा म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने घातले श्री मंगळ ग्रह देवाला साकडे.

सविस्तर वृत्त की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने रिक्त जागी मंत्रीपदासाठी अमळनेर चे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांची वर्णी लागावी म्हणून अमळनेर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या पदाधिकार्यांनी श्री मंगळ ग्रह मंदिरात जाऊन श्री मंगळग्रह देवाला साकडे घातले.
यावेळी राष्ट्वादी विद्यार्थी कॉँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष सनी गायकवाड, तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील, शहराध्यक्ष कृष्णा बोरसे,शहर कार्यध्यक्ष मनीष देसले,तालुका उपाध्यक्ष प्रणव चौधरी,शहरसचिव प्रेम मोरे, कुणाल पाटील,जयेश महाजन,रोहित शिसोदे, कुणाल शिंगाणे, उदय पाटील,आदित्य संदानशीव, चेतन पाटील, शामकांत पाटील,देव गोसावी आदी कार्यकर्त उपस्थित होते.
