अमळनेर शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्याच्या प्रवेशासह सत्कार मेळावा मोठ्या उत्साहात पडला पार..

अमळनेर येथील शिवसेनेचा (एकनाथ शिंदे गट )कार्यकर्ता मेळावा शहरातील वाणी मंगल कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.

सविस्तर वृत्त असे की,आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा विजयी झेंडा प्रत्येक ठिकाणी रोवला जावा, शिवसेना घराघरात पोहचून पक्षाला बळकटी मिळावी या उद्देशाने दि. २६ रोजी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात शिवसेनेचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.

   मेळाव्याचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील होते. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी आणि ऍड. ललिता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे शिवप्रतिमा देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर युवा सेना जिल्हा प्रमुख रोहित कोगटा, तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील सह सामाजिक कार्यकर्ते सुनील भामरे, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, श्रीराम चौधरी आदी सह सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

    यावेळी मा. आ. शिरीष चौधरी, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, सुरेश अर्जुन पाटील, ऍड. ललिता पाटील, गुलाब पाटील, रोहित कोगटा यांनी मनोगतातून शिवसेना वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने कार्य करून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा प्रत्येक ठिकाणी रोवला जाईल,याबाबत गावापातळीवर कार्य करावे,असे आवाहन केले.

यावेळी सात्रीच्या महिला कार्यकर्त्या ललिता जगदीश सोनवणे, गांधलीपुराच्या रेखा विक्रम गोयर, ताडेपुराच्या योगिता आकाश पवार यांच्या समवेत जुनोने, पाडळसरे, रंजाने, जळोड, सोनखेडी, रामेश्वर, देशमुख वाडा आदी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

   मेळाव्याचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख प्रवीण पाटील यांनी केले. मेळाव्यात तालुक्यातील शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!