गलवाडे रोड राज्य मार्ग 06 वर त्वरित गतिरोधक बसवा…स्थानिक नागरिकांनी केली मागणी 

अमळनेर  राज्य मार्ग 06, गलवाडे रोड, दाजीबा नगर ते पिंपळे नाला परिसरात रस्त्यालगत मोठी लोकवस्ती आहे. तसेच महामार्गला लागूनच शाळा असल्यामुळे शाळेकरी मुलांची वर्दळ सुरु असते. येणाऱ्या वेगवान वाहनांमुळे रस्त्यावरील शाळकरी मुल तथा वयोवृद्ध यांना जिकरीचे होऊन बसले आहे.तरी सदर रस्त्यावर गतिरोधक, सुचना फलक, तथा वाहनाचा वेग नियंत्रीत ठेवण्याचा दृष्टीने क्रॉसींग रस्त्यावर तात्काळ फलक लावल्यास होणारे अपघाताला आळा घालता येवू शकतो, अश्या आशयाचे निवेदन स्थानिक नागरिकांनी अमळनेर कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.

  सदर निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते दिपक चौघुले, बाळासाहेब संदानशिव,संदीप नाईक,महेश कालार,राहुल शर्मा,संजय चौधरी,गोपाल पाटील,पंकज चौधरी,राहुल पुकळे,गणेश जोशी आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!