अमळनेर येथील मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कलागुरु मंगल कार्यालय,अमळनेर येथे माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार.

