अमळनेर नगरपरिषदेची धडक कारवाई मोहिमेअंतर्गत थकीत मालमत्ता धारकांवर केली जप्तीची कारवाई..

अमळनेर नगरपरिषदेच्या सन 2024-2025 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर इत्यादी कराच्या वसुली कामी नगरपरिषद मार्फत धडक मोहीम सुरू झाली असून सदर मोहिमेत नागरिकांचे नळ कनेक्शन बंद करणे, पाण्याच्या मोटारी जप्त करणे यासह थकबाकी वसूली भरारी पथकाने वसुलीची धडक मोहीम सुरू केलेली आहे.

या भरारी पथकाने सुमारे 125 पाण्याच्या मोटारी जप्ती सह सुमारे 240 नळ कनेशन बंद केले आहे.

मोहिमेत यांना दिली मालमत्ता जप्तीची अंतिम नोटीस…

1. मदरसा ए फैजअल संस्था अलफाईज उर्दू शाळा अमळनेर

2. चेअरमन नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित S.N.D.T.कॉलेज वर्किंग वुमन हॉस्टेल, मराठा मंगल कार्यालयजवळ P. 161.

3. श्री. गणपत तानिराम वाणी C/O सुनिल भामरे विजय मारोती समोर पावभाजी सेंटर.

4. हॉटेल योगेश C/O महेंद्र पमनदास ललवाणी

या 4 थकीत मालमत्ता धारकांकडे नगरपरिषद अमळनेरची मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणात रक्कम येणे असल्यामुळे त्यांना त्यांची मालमत्ता जप्तीची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

यांना लावण्यात आले सील…

ओम इंडस्ट्रिज अमळनेर यांच्या A विंग व B विंग मधील प्लॉट नंबर पुढीलप्रमाणे-

A विंग 1) 5/712, 2) 5/713, 3) 5/720 — B विंग 1) 5/723, 2)1/5/733

अशा सहा फ्लॅटला नगरपरिषद अमळनेर तर्फे त्यांच्याकडे असलेल्या थकीत मालमत्ता कर न भरल्यामुळे सील लावण्यात आले .सदर ओम इंडस्ट्रिज अमळनेर चे मालक श्री. नीरज दीपचंद अग्रवाल अमळनेर यांना समक्ष बोलवून मालमत्ता कर भरण्याबाबत सुचना देण्यात आली. तसेच या सह इतर थकबाकी धारकांच्या मालमत्तावर नगरपरिषदेचे नाव लावण्यात येईल अशी समज प्रत्येक थकबाकीदारास देण्यात आलेली आहे.

कारवाई करणारे कर्तव्यदक्ष पथक….

सदर कारवाई मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वारंट अधिकारी तथा पथक प्रमुख 1) श्री. संदीप जगन्नाथ पाटील, 2) श्री. सुनिल शिवाजी पाटील, 3) श्री. अजित लांडे , 4)श्री. संतोष पंढरीनाथ बि-हाडे , 5) श्री. किरण प्रकाश कंडारे, 6) श्री. प्रविणकुमार बैसाणे, 7)श्री. डीगंबर वाघ, 8) श्री. लौकीक समशेर, तसेच उपमुख्याधिकारी श्री. आर.डी. चव्हाण व कर निरीक्षक श्री. आर.डी. लांबोळे व अधिनस्त कर्मचारी श्रीमती राधा नेतले, निखिल संदानशिव, जगदीश बि-हाडे, बाळकृष्ण जाधव, अखिल काझी यांचे मार्फत कारवाही करण्यात आली.

मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांचे नागरिकांना आवाहन…

अमळनेर नगरपरिषद हद्दीतील तमाम नागरिकाना याद्वारे पुन्हा आवाहन करण्यात येते की आपल्याकडे असलेल्या थकीत कराच्या रकमा त्वरित भरून परिषदेस सहकार्य करावे असे न झाल्यास थकीत मालमत्ता धारकांची नावे त्या त्या प्रभागामधे डिजिटल बॅनर द्वारे प्रकाशित करून बॅनर च्या खर्च देखील थकबाकी धारकांकडुन वसूल केला जाणार असून नागरिकांनी आपल्यावर अशी वेळ येणार नाही याची खबरदारी घेऊन येणारा कटू प्रसंग टाळावा तसेच कराच्या भरणा करणेसाठी सुटीच्या दिवशी देखील वसुली विभाग सुरु राहणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!