शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न प्रलंबित असल्याने तात्काळ आमसभा घ्यावी..अनंत निकम (सल्लागार, राष्ट्रवादी

अमळनेर येथील लोकप्रतिनिधीनी अद्याप आम सभा घेतली नसल्याने तात्काळ ती घ्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे आवाहन निवेदना द्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गट विकास अधिकारी यांना देण्यात आले.

अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने तात्काळ आमसभा घेण्याबाबत प्रत्र देऊन देखील आपल्या कार्यालयाकड़ून कोणत्याही प्रकारची दखल अथवा खुलासा मिळालेला नाही तसेच वांझोटे कारणा व्यतिरिक्त काहीही मिळत नाही. अमळनेर मतदार संघात शेतकरयाचे प्रचंड प्रश्न प्रलंबीत असतांना कुठलीही लाज-लज्जा शर्म नबाळगता आम सभेला बगल देवून तोंड लपविण्याचे कार्य स्थानिक लोक प्रतिनिधीकडून सुरु असून सदर बाबत दूर्दवी व लोकशाहीसाठी घातक आहे. त्याकारणे आम्हाला स्मरणपत्र २ देणे भाग झाले असून सदर पत्र
मिळाल्यापासून १५ दिवसात आपण आमसभेबाबत खुलासा व नियोजन न केल्यास आपल्या पंचयात समिती कार्यालय,अमळनेर येथे संविधानिक पध्दतीने अनोखे पध्दतीचे अंदोलन करण्यात येईल याची गार्भियाने नोंद घ्यावी. यात कायदया व सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपले कार्यालय त्यास जबाबदार राहतील याची कृपया नोंद घ्यावी, अश्या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील व तालुका सल्लागार अनंत निकम यांनी अमळनेर गटविकास अधिकारी यांना देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!