अमळनेर मतदारसंघात महायुती तर्फे अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारी जाहीर….. कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

 

अमळनेर प्रतिनिधी येथील विधानसभा मतदारसंघासाठी महायुती तर्फे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारिवर शिक्कामोर्तब होऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे काल दुपारी अधिकृत नाव जाहीर झाल्याने अमळनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

जल्लोष करताना……..राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष भागवत पाटील, शहर अध्यक्ष मुक्तार खाटीक, भाजपा माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, भाजपा शहर अध्यक्ष विजय राजपूत, भूषण पाटील अलिम मुजावर ,विजू पाटील, विकांत पाटील,सुनिल पवार गुणवंत पाटील, डॉ.रामराम पाटील यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!