कर्मचाऱ्यांच्या रेट्याने डॉ वर्षा लहाडे विरोधात चौकशी समिती गठीत….आठ दिवसांच्या आत कार्यवाही नझाल्यास पुन्हा काम बंद आंदोलन करणार

नंदुरबार प्रतिनिधी,फहीम शेख,येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या एकाधिकार मनमानी कारभाराच्या विरोधात कर्मचारी आक्रमक.

सविस्तर वृत्त असे की,नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाने या कर्मचाऱ्यांना दादागिरी करणे,कर्मचाऱ्यांऱ्याकडून रजा, वार्षिक वेतनवाढ , भत्ते लावणे, बदली, जॉइनिंग इ. प्रशासकीय कामां करिता आर्थिक देवाण घेवाण करणे, निकुष्ठ दर्जाचे पेटी साहित्य खरेदी, NRHM, तदर्थ नोकर भर्तीत निवडसमितीला डावलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा आर्मी, विश्व आदिवासी सेवा संघटना, बिरसा फायटर्स, इ.विविध सामाजिक संघटना आणि जिल्हा रुग्णालय व संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,NRHM, RBSK चे सर्व अधिकारी,स्टॉप, कर्मचारी यांनी देखील काली फिती लावून साखळी पद्धतीने तसेच कामबंद आंदोलनाला सुरवात केली आहे, तसेच दि 24 जानेवारी 2025 पासून बेमुदत धरणा आंदोलनाचा 33 वा दिवस सुरु आहे , या दबावामुळेच आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्य पातळी वरील चौकशी कमिटीने दिनांक-24 व 25फेब्रुवारी 2025 रोजी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लेखी जबाब, आर्थिक देवाण- घेवाण झाल्याचे ऑनलाईन ट्रांजेक्शन चौकशी कमिटीने पुरावे म्हणून घेऊन जवळ जवळ तीनशे ते चारशे अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाब जबाब लिहून दिले आहेत तसेच चौकशी कमिटीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या सामाजिक व अधिकारी, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यां सोबत आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन कमिटीच्या सर्व अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट देऊन साकारत्मक चर्चा करून आश्वस्थ केले की, कमिटीचा अहवाल हा दोन दिवसात मा. आयुक्त, सचिव सो, आरोग्य भवन, मुंबई यांच्या मार्फत मा. आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या कडे सादर करून चार ते पाच दिवसात डॉ. वर्षा लहाडे यांच्याबाबतीत लवकरात लवकर सखोल चौकशी करून बदली, निलंबीत, बडतर्फ सारखी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
जर कमिटीने चौकशी करून देखील डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर आठ दिवसाच्या आत योग्य ती कार्यवाही नकेल्यास सामाजिक संघटना आणि जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ केंद्राचे अधिकारी व सर्व
कर्मचारी संघटनानी कामबंद आंदोलन कारण्याचा इशारा दिला आहे व सदरचे आंदोलन हे तात्पुरते स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!