अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील सिद्धांत राहुल निकम हा NFSC(National Fellowship For Schedule Caste) शिष्यवृत्ती करिता पात्र ठरला आहे.
सविस्तर वृत्त की,सामाजिक न्याय एवं अधिकारीता मंत्रालय,भारत सरकार यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या यादीनुसार अमळनेर येथील सिद्धांत राहुल निकम हा NFSC शिष्यवृत्ती करिता पात्र ठरला आहे.
सिद्धांत निकम हा M.Pharmacy हि पदवी 83.69% गुणांसह उत्तीर्ण झालेला आहे. तो 03 वेळा G (Graduate Pharmacy Aptitute Test) परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.तसेच तो 03 वेळा NET परीक्षा उत्तीर्ण झालेला असून एकदा GATE परीक्षा देखील उत्तीर्ण झालेला आहे.
सिद्धांत हा सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विश्वविद्यालय लखनौ,उत्तर प्रदेश येथे Ph.D. करीत आहे. तो समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे कार्यरत असणाऱ्या प्रा.डॉ.राहुल निकम यांचा मुलगा आहे.
सिद्धांत निकम याने मिळविलेल्या यशा चे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.