अमळनेर: रमजानच्या पवित्र महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, येथील एका चिमुकल्याच्या भक्तीची सध्या शहरात चर्चा होत आहे. अमलनेर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसीफ तेली यांचा अवघ्या ४ वर्षांचा मुलगा शानअली तौसीफ तेली याने रमजानचा पहिला रोजा पूर्णपणे पार पाडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कौतुकास्पद जिद्द
उन्हाळ्याची चाहूल आणि मोठी ओढ असतानाही, शानअलीने पहाटे ‘सहरी’पासून ते सायंकाळी ‘इफ्तार’पर्यंत अन्नाचा कणही न घेता आणि पाण्याचा थेंबही न पिता हा उपवास पूर्ण केला. एवढ्या लहान वयात दाखवलेली ही शिस्त आणि धर्माप्रती असलेली श्रद्धा पाहून कुटुंबासह परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
परिवारात आनंदाचे वातावरण
कु.शानअलीने आपला पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे वडील तौसीफ तेली आणि कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. इफ्तारच्या वेळी चिमुकल्या शानअलीला शुभाशीर्वाद देण्यासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवाराने गर्दी केली होती.
“लहान मुलांमध्ये धार्मिक संस्कार आणि संयमाची सवय लागणे महत्त्वाचे असते. शानअलीने स्वतःहून रोजा धरण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो यशस्वीपणे पूर्णही केला, याचा आम्हाला अभिमान आहे.”
— तौसीफ तेली (अध्यक्ष, शहर युवक काँग्रेस)
