अमळनेर येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती निमित्ताने बहुजन समाजातील कार्यकर्ते यांनी एकजुठीचे दर्शन घडवून केले वदंन.
सविस्तर वृत्त असे की, स्वराज्य संकल्पनेच्या जननी तथा छत्रपती शिवरायांच्या माते सह गुरु असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती निमित्ताने अमळनेर मध्ये त्यांना वदंन करण्यासाठी बहुजन समाजातील मान्यवरांनी प्रबुद्ध विहार, स्टेशन रोड येथे एकत्रित येऊन केला मानाचा मुजरा.सुरुवातीला मान्यवरानी माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. डी ए पाटील सरांनी जिजाऊ वदंना गायली.
या प्रसंगी प्रा डॉ राहुल निकम यांनी संबोधन करतांना सांगितले की, राष्ट्रमाता माँ जिजाऊ या उत्तम राज्यकरती स्त्री होत्या,त्या एक शिवरायाना घडविनारी महान गुरु,शस्त्रविद्या पारंगत माता होत्या ,अंधश्रद्धा च्या पलीकडे जाऊन शिवरायांना त्यांनी स्वराज्याची दृष्टी दिली,शेतकऱ्यां विषयी ते खूप भावनिक असायचे,ते आपल्या स्वराज्यातील शेतकऱ्यांना बी बियाने पुरवित असतं,त्या एक उत्तम अर्धागणी सह एक उत्तम आई वं मुलगी सुद्धा होत्या. म्हणूनच त्या जन्माला आल्या नंतर राजे लखूजी जाधव यांनी हत्ती वरून साखर वाटप केली होती.परिपूर्ण स्त्री म्हणून त्या एक उत्तम उदाहरण म्हणून जगा समोर आहेत. आजच्या युगातील स्त्री असो पुरुषानी त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून आपल्या घरात शिवाजी घडवावा.
या प्रसंगी उपस्थित बहुजन समाजातील मान्यवरांनी नवं नियुक्त उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दुसऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेविका सविता संदानशिव यांना ही सन्मानीत करण्यात आले.
