निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी…!चु
कले आमुचे कांही त्याची क्षमा असावी…!!
अमळनेर प्रतिनिधी,येथील गणेश विसर्जन शांततेत तथा गुलालाची उधळण करीत ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.शहरातील मुख्य मार्गांवरून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल, ताशे, डीजे सह विविध वाद्यांचा मिरवणुकीमध्ये समावेश करण्यात आला होता.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळे नागरिकांचे सहकार्य लाभले. भावपूर्ण वातावरणात, ढोल-ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत निरोप दिला.

गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून सहाय्यक पोलिस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, डीवायएसपी सुनील नंदवाळकर,पोलिस निरीक्षक विकास देवरे,एपीआय जिभाऊ पाटील यासह दंगा विरोधी पोलिस दलाचे पथक,राज्य राखीव दलाची एक तुकडी, होमगार्ड आदींसह शेकडो पोलिस कर्मचारी बंदाेबस्तामध्ये सहभागी झाले होते.विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर व पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या प्रसंगी प्रातंधिकारी महादेवजी खेडकर, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा,मुख्याधिकारी नेरकर,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.
तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत पार पडला. शहरातील जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गणेश मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला.या प्रसंगी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये तरुणाईसह ज्येष्ठांचाही उत्साह वाखाणण्यासारखा होता.
येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीला ढोल, ताशे गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील व्यापारी गणेश मंडळ सह लहान मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका शांततेत निघाल्या.
या प्रसंगी शिस्तबध्द गणेश मंडळाचां शहर व तालुका पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तसेच प्रशासना कडून शाल, श्रीफळ पुष्पहार सह” श्री सन्मान ” देऊन स्वागत करण्यात आले.
विषेश म्हणजे मिरवणुकीदरम्यान सामाजिक एकोपा दिसून आल्याने मंडळांचे पदाधिकारी,नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी शांतता समितीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले.
