अमळनेर प्रतिनिधी,अमळनेर विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा उमेदवारी करण्यास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा विद्यमान आमदार ना.अनिल पाटील हे उद्या मंगळ ग्रह देवस्थानचे दर्शन घेऊन पक्षातील मान्यवरांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढून महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित राहण्याची शक्यता असून याव्यतिरिक्त खासदार स्मिताताई वाघ व भाजप,शिवसेना,रीपाई (आठवले गट) चे पदाधिकारी व कार्यकर्ते,जिल्ह्यातील महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सदर महारॅली पैलाड चौफुली,दगडी दरवाजा,तिरंगा चौक,बस स्टँड,महाराणा प्रताप चौक मार्गे तहसील कार्यालयाजवळ रॅली चा समारोप होणार आहे.मंत्री अनिल पाटील व महायुती तर्फे या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

अनिल पाटील यांनी मतदारसंघातील समस्त नागरिक व हितचिंतकांनी य मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन केले आहे.
